भाषेची प्रमुख कार्ये

 

भाषेचे प्रमुख कार्य कोणते?

भाषेची प्रमुख कार्ये: भाषा हे व्यक्तीच्या गरजा, इच्छा, तक्रारी, मते, अनुभव इत्यादी व्यक्त करण्याचे एक साधन आहे. भाषेच्या माध्यमातून व्यक्ती आपल्या भावना प्रगट करू शकते. तसेच भाषा हे माहिती आणि कोशल्ये शिकण्याचे एक साधन आहे. भाषेमुळेच सामाजिक आंतरक्रिया चालू राहतात, माणसाची एकमेकांशी ओळख होते आणि संवाद सुरू होतो .

भाषेचे प्रकार

1)मौखिक भाषा (Oral Language)

मौखिक भाषेमध्ये तोंडाद्वारे निघणाऱ्या ध्वनीचा समावेश होतो. जेव्हा मानवी आस्तित्व निर्माण झाले तेव्हाच या भाषेचा जन्म झाला. सर्व सजीव जन्म झाल्यापासूनच बोलण्यास सुरुवात करतात. जेव्हा माणुस जन्माला येतो तेव्हा तो बोबडे बोलतो आणि काळांतराने परिस्थितीनुसार स्पष्ट बोलू लागतो.

2)लेखी भाषा (Written Language)

लेखी भाषेचा वापर आजवर फक्त मानवानेच केला आहे असं पाहण्यात आलं आहे. जेव्हा कोणी श्रोता समोर नसेल तेव्हा संवादासाठी आपण लेखी भाषेचा वापर करतो. परंतु, लेखी भाषा शिकण्यासाठी शिक्षणाची गरज असते. यामुळेच आपल्या शालेय पाठ्यक्रमात काही भाषा विषय समाविष्ट केले आहेत. लेखी भाषा शिकण्यासाठी शाळेत गेलं पाहिजे असं काही बंधन नाही, पण भाषेचा अभ्यास करणे बंधनकारक राहील.

3)सांकेतिक भाषा(Sign Language)

तुम्हांला ठाऊक असेलच लहान मुळे किंवा मुखी लोक बोलण्यासाठी सांकेतिक भाषेचा वापर करतात. सांकेतांमध्ये डोळे, जिभ, कान, हात आणि पाय अशा मानवी अवयवांचा समावेश होतो.

अधिक जाणून घेण्यासाठी 

👇👇👇👇👇

येथे क्लिक करा


Comments

Popular posts from this blog

विरुद्धार्थी शब्द | Opposite words in Marathi

चल रे भोपळ्या टुणुक टुणुक | Chal Re Bhoplya Tunuk Tunuk |Marathi Stories For Kids