तुमचा उपवास हेल्दी उपवास होईल | Your fast will be a healthy fast
Healthy Fast Food सृजनाचा, चैतन्याचा हा उत्सव भारतीयांच्या परंपरा, सणावारांमधील प्रमुख असा आहे. नवरात्र म्हणजे नऊ रात्री साजरा होणारा उत्सव. या उत्सवात नऊ दिवस उपवास केल्यास देवीची कृपा, आशीर्वाद लाभून घरात सुख-समृद्धी नांदते, ही भाविकांची श्रद्धा आहे. म्हणून नऊ दिवस उपवास केले जातात. काही ठिकाणी दोन्ही वेळ उपवासाचे पदार्थ सेवन करण्याची प्रथा आढळते, तर काही ठिकाणी धान्य फराळ, एक भुक्त उपवास केले जातात, म्हणजेच एकवेळ उपवासाचे पदार्थ व रात्री दूधातील दशमी, भेंडीची तूपाच्या फोडणीतील भाजी असे पदार्थ खावून उपवास केले जातात.नऊ दिवस उपवास म्हणजे खरोखरीच आपल्या संयमाची, आरोग्याची परीक्षाच असते. एकतर उपवासाच्या पदार्थांमध्ये शेंगदाणे, साबुदाणा यांसारख्या घटकांचा समावेश असल्यामुळे अॅॅसिडिटीचा त्रास होतो. शिवाय नऊ दिवस उपवासाचे पदार्थ करावे तरी कोणते? हा यक्ष प्रश्न असतोच. उपवास तर करायचेय परंतु या उपवासांमुळे अशक्तपणा, घशात जळजळ असेही व्हायला नको..या पेचात तुम्ही पडला असाल तर नवरात्रासाठी पुढील प्लॅन फॉलो करा..यामुळे तुमचा उपवास हेल्दी उपवास होईल आणि नऊ दिवस तरतरी, शक्ती याची अजिबात ...