Posts

Showing posts with the label टाच दुखी वरील घरगुती उपाय

टाचा दुखी | Heels Pain

Image
    Heals Bone Pain    टाचदुखीवर काही घरगुती उपाय आजकालची जीवनशैली अतिशय धावपळीची आणि गुंतागुंतीची आहे. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. धावपळीमुळे पाय दुखणे, तळवे, टाचा दुखणे किंवा त्यांना सुज येणे अशा समस्या उद्भवतात. तर कधी खूप वेळ उभे राहील्याने, वजन अधिक असल्यास किंवा चूकीचे चप्पल, बूट घातल्यास टाचा दुखी लागतात. मात्र हे दुखणे अतिशय असह्य होते. या घरगुती उपयांनी टाचांच्या दुखण्यावर आराम मिळेल.  शरीराचा भार पेलता यावा यासाठी पायाच्या तळव्यांची रचना वक्राकार पद्धतीने करण्यात आली आहे. चालणं हा शरीरासाठी उत्तम व्यायाम आहे. मात्र अनेकांना टाचदुखी किंवा तळवे दुखीची समस्या असते. त्यामुळे अनेक वेळा चालताना किंवा उभं राहिल्यावर ही समस्या तीव्रतेने जाणवते. चालत असताना शरीराचा भार गुडघे, पावले आणि पायांच्या तळव्यावर येतात. शरीराचा भार पेलता यावा यासाठी पायाच्या तळव्यांची रचना वक्राकार पद्धतीने करण्यात आली आहे. या तळव्यांमध्ये प्लान्टर फेशिया हा स्नायूंचा पडदा असतो. या प्लांटर फेशियाला इजा होऊन लहान भेगा (मायक्रो टियर्स) निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हे स्नायू घट्ट होतात आणि टाचदुखी स