डोळ्याचे आरोग्य | Eye Health
Natural Eye डोळ्याची निगा - डोळ्याच्या तक्रारी - उपाय गेल्या काही वर्षात संगणकावर काम केल्याने, प्रदूषणामुळे डोळ्याच्या तक्रारी सातत्याने वाढत्या आहेत. डोळे दुखणे, चुरचुरणे, लाल होणे, डोळ्यांची आग होण्याचा त्रास होतो. मात्र डोळ्यांची काळजी घेतली जात नाही. शांतपणे डोळे बंद करून बसणं गरजेचं असतं, त्यामुळे डोळ्यांचं स्वास्थ्य सुधारतं. पण या साध्या मात्र अतिशय महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे डोळ्यांचे आजार व त्यांच्याशी संबधित समस्या वाढत आहेत.प्रदूषण, धूळ, मातीमुळे डोळ्यांचे आरोग्य बिघडते. कमी वयात चष्मा लागतो, डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात, पापण्यांवर सूजही येते. डोळ्यांचे आरोग्य जपणे महत्त्वाचे असते. पापण्यांवर सूज येणे, डोकेदुखी यासारख्या आजारांचे प्रमाण मागील काही वर्षांमध्ये वाढते आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात तरुणाईला स्वास्थ्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. हे टाळा : लहान मुलांना उन्हाळ्यात काजळ लावू नये. महिलांनी चेहऱ्यावर कॉस्मेटिक वापरताना ते डोळ्यात जाणार याची काळजी घ्यावी. फूटपाथवर गॉगल्सची विक्री केली जाते. मात...