Posts

Showing posts with the label nutritional value of foods list

योग्य आहार आणि रोगप्रतिकारशक्ती | Proper Diet and Immunity

Image
  Nutritious Food पोषक अन्न / Nutritious Food अन्न / Food : सूत्र :-  अद्यते अस्मै इति अन्नम् ।  अर्थ : - ज्याला खाल्ले जाते, ते ‘अन्न’ होय.  ज्या द्रव्यांची चव आणि वास चांगला असून जे दिसायला आकर्षक आहेत अन् जे योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात खाल्ले असता पचन अन् शोषण झाल्यावर शरिराच्या पेशींची झालेली झीज भरून काढू शकतात, नवीन शरीरघटक निर्माण करू शकतात, शरिराला लागणारी शक्ती उत्पन्न करतात आणि मनाला तृप्ती अन् आनंद देतात, अशा द्रव्यांना ‘अन्न’ म्हणतात. अन्नामुळे जीवन घडते तर पोषक अन्नामुळे उत्तम आणि सर्वार्थाने स्वस्थ ( Healthy )  असे मानवी जीवन घडते. तुम्ही खाता त्याप्रमाणे तुमचे व्यक्तित्व ( Personality )  घडते. तुम्ही काय खाता, यापेक्षा तुम्ही काय खात नाही, हे महत्त्वाचे ठरते. आजच्या स्पर्धेच्या, ताणतणावांच्या आणि प्रदूषणाच्या जगात आत्मविश्वासाने, उत्साहाने आगेकूच करायची असेल तर शरीर निरोगी ठेवावे लागेल. आहार संतुलित हवा. किमान ४० अन्नघटक ( Food ingredient )  आहारात असावेत. धान्य, डाळी, भाज्या, फळे, दूध, दही, ताक, तेल तुपातून ते मिळतील. अन्न ख...