वचन | एकवचन - अनेकवचन | ( मराठी व्याकरण )vachan
वचन - एकवचन - अनेकवचन
वस्तू एक आहे की अनेक आहेत ते सूचित करणाऱ्या शब्दाच्या गुणधर्मास व्याकरणात 'वचन' असे म्हणतात.
मराठी प्रमाणेच बहुसंख्य भाषात वचनांचे एकवचन आणि अनेकवचन असे दोन प्रकार असतात, काही थोड्या भाषात द्विवचन अथवा इतरही व्यवस्था पहावयास मिळतात.
नामावरून जसे त्याचे लिंग समजते त्या नामाने दर्शवलेली वस्तु एक आहे की त्या वस्तु एकाहून अधिक आहेत हे ही कळते. नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो एक धर्म आहे त्याला वचन असे म्हणतात.
उदा :-
- मुलगा – मुलगे
- घोडा – घोडे
- ससा – ससे
- आंबा – आंबे
- कोंबडा – कोंबडे
- कुत्रा – कुत्रे
- रस्ता – रस्ते
- बगळा – बगळे
- देव – देव
- कवी – कवी
- न्हावी – न्हावी
- लाडू – लाडू
- उंदीर – उंदीर
- तेली – तेल
- वेळ – वेळ
- चूक – चुका
- केळ – केळी
- चूल – चुली
- वीट – वीटा
- सून – सुन
- गाय – गायी
- वात – वाती
- नदी – नद्या
- स्त्री – स्त्रीया
- काठी – काठ्या
- टोपी – टोप्या
- पाती – पाट्या
- बी – बीया
- गाडी – गाड्या
- भाकरी – भाकर्या
- वाटी – वाट्या
- ऊ – ऊवा
- जाऊ – जावा
- पीसु – पीसवा
- सासू – सासवा
- जळू – जळवा
Comments
Post a Comment