Posts

Showing posts from November, 2022

बुडबुड घागरी | Bud Bud Ghagri| Marathi Stories For Kids

Image
   बुडबुड  घागरी - Bud Bud Ghagri Bud Bud Ghagri marathi story Bud Bud Ghagri Bud Bud Ghagri: तो टोपी घालणारा उंदिरमामा आठवतोय? तो गेला एकदा जंगलात. तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले. त्या तिघांची चांगली मैत्री जमली. एक दिवस त्या तिघे  मित्रांनी खीर बनविण्याचे ठरवले. माकड म्हणाले 'मी आणतो साखर'. मांजर म्हणाले 'मी आणते दूध'. उंदीर म्हणाला 'मी आणतो शेवया'. तिघांनी पातेलेभर खीर केली.  मग माकड म्हणाले 'चला आपण आंघोळ करून येऊ आणि मगच खीर खाऊ'. इकडे मांजराच्या तोंडाला पाणी सुटले होते. मांजर म्हणाली  तुम्ही जा मी खीर शिजवते. माकड आणि उंदीर म्हणाले, ठीक आहे आणि ते दोघे आंघोळ करण्यासाठी जातात.  Marathi Stories For Kids  मांजरीच्या तोंडाला पाणी सुटणे ती थोडी खीर खाते .तेवढी  खाऊन झाली पण तिला आणखी खावी वाटली.पुन्हा थोडी घेतली असे करत तिने सगळी खीर खाऊन टाकली . थोडया वेळाने माकड व उंदीर आले. पहातात तो काय, खिरीचे पातेले रिकामे ! त्यांनी मांजराला विचारले 'खीर कोणी खाल्ली?' मांजर म्हणाले, 'मला नाही माहीत.'  मग माकडाने एक घागर घेतली व सर्वजण नदीवर ग...

चल रे भोपळ्या टुणुक टुणुक | Chal Re Bhoplya Tunuk Tunuk |Marathi Stories For Kids

Image
    चल रे भोपळ्या टुणुक टुणुक - Chal Re Bhoplya Tunuk Tunuk  Chal Re Bhoplya Tunuk Tunuk marathi goshta Chal Re Bhoplya Tunuk Tunuk Chal Re Bhoplya Tunuk Tunuk: एक होती म्हातारी. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. लेक रहायची दुसर्या गावाला. रस्त्यानं जाताना मधेच एक मोठे जंगल होत. म्हातारी काठी टेकत, टेकत रस्त्याने निघाली. वाटेत तिला भेटला कोल्हा. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो'. पण म्हातारी हुषार होती.   ती म्हणाली 'मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठ मुठ्ठ होते, मग मला खा.' कोल्ह्याला म्हातारीचे म्हणणे पटले.म्हातारी पुढे निघाली. तिला भेटला वाघ. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो'. त्याने डरकाळी फोडली. म्हातारी त्याला म्हणाली 'मला खाऊन तुझे पोट भरणार नाही.त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठमुठ्ठ होते, मग मला खा. ' वाघाची अशी समजूत काढून म्हातारी पुढे निघाली.लेकीकडे गेली.      Marathi Stories For Kids      ती खूप दिवस मजेत र...

उंदराची टोपी | Undarachi Topi

Image
   उंदराची टोपी - Undarachi Topi Mouse Cap Undarachi Topi: एक होता उंदिरमामा. रस्त्याने जाताना त्याला मिळाले एक फडके.फडके घेऊन तो गेला धोब्याकडे. धोब्याला म्हणाला 'धोबीदादा,धोबीदादा माझे फडके धुवून दे. धोब्याने फडके धुवून दिले. मग उंदिरमामा गेला शिंप्याकडे. 'शिंपीदादा, 'शिंपीदादा,शिंपीदादा मला एक छानशी टोपी शिवून दे तिला रंगीत गोंडेही लाव. शिंप्याने उंदिरमामाला टोपी शिवून दिली.  उंदिरमामाने टोपी डोक्यावर घातली एक ढोलके घेतले. ते वाजवत तो गाणे गाऊ लागला ' राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान. ढुम,ढुम,ढुमक !' राजाने हे ऐकले . तो शिपायांना म्हणाला ' जा रे, त्या उंदराला पकडून आणा.    शिपायांनी उंदिरमामाला पकडले. दरबारात आणले. त्याची टोपी काढून राजाकडे दिली. मग उंदिरमामा म्हणाला 'राजा भिकारी, माझी टोपी घेतली. ढुम,ढुम,ढुमक !'  हे ऐकून राजा खूपच रागावला. त्याने उंदराकडे टोपी फेकून दिली. उंदिरमामाने टोपी पुन्हा डोक्यावर घातली व तो गाणे गाऊ लागला 'राजा मला भ्याला. माझी टोपी दिली. ढुम,ढुम,ढुमक !' हे गाणे गात गात तो राजवाडयातून निघून गेला. तात्पर्य:  शक्तीपेक्...

Funny Rhymes|sing a song

Image
 Look And Say : Funny Rhymes ROW ROW..... ROW ROW.. 👉👉👉 click here and see more .. Read and Learn poem 👉👉 whatsapp ग्रुपला जोडा👈👈

look and read | simple sentences

LOOK AND READ 1.Hello! friends, I am Soham Shyam Kale. 2. I am In standard Fourth. 3.My school name is Z.P.C.P.P.S. SHELGAON. 4.I think ,you are nice in vaccant of DIWALI. 5.I hope you all completed your home-work. Read above sentences and enjoy it. Read and Learn poem 👉👉 whatsapp ग्रुपला जोडा👈👈

वचन | एकवचन - अनेकवचन | ( मराठी व्याकरण )vachan

 वचन - एकवचन - अनेकवचन वस्तू एक आहे की अनेक आहेत ते सूचित करणाऱ्या शब्दाच्या गुणधर्मास व्याकरणात 'वचन' असे म्हणतात .  मराठी प्रमाणेच बहुसंख्य भाषात वचनांचे एकवचन आणि अनेकवचन असे दोन प्रकार असतात, काही थोड्या भाषात द्विवचन अथवा इतरही व्यवस्था पहावयास मिळतात. नामावरून जसे त्याचे लिंग समजते त्या नामाने दर्शवलेली वस्तु एक आहे की त्या वस्तु एकाहून अधिक आहेत हे ही कळते. नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो एक धर्म आहे त्याला वचन असे म्हणतात. उदा :- मुलगा – मुलगे घोडा – घोडे   ससा – ससे आंबा – आंबे कोंबडा – कोंबडे कुत्रा – कुत्रे रस्ता – रस्ते बगळा – बगळे देव – देव कवी – कवी न्हावी – न्हावी लाडू – लाडू उंदीर – उंदीर तेली – तेल वेळ – वेळ चूक – चुका केळ – केळी चूल – चुली वीट – वीटा सून – सुन गाय – गायी वात – वाती नदी – नद्या स्त्री – स्त्रीया काठी – काठ्या टोपी – टोप्या पाती – पाट्या बी – बी या गाडी – गाड्या भाकरी – भाकर्‍या वाटी – वाट्या ऊ – ऊवा जाऊ – जावा पीसु – पीसवा सासू – सासवा जळू – जळवा wachan फळांची नाव | Fruits Name in Marathi 👉👉 whatsapp ग्रुपला जोडा👈👈