आरोग्याचा मूलमंत्र चालणे हाच एक उपाय | The basic mantra of health - walk

 

benifites of walk
Walk for Health


सकाळी चालणे आवश्यक का आहे ? 

   जेव्हा तुम्ही सकाळी चालायला जाता, तेव्हा कोवळे ऊन जर असेल तर तुम्हाला व्हिटॅमिन-डी भरपूर प्रमाणात मिळेल. त्यामुळे शहरातील विटामिन डी ची कमतरता भरून निघेल. दररोज सकाळी चालल्यामुळे तुम्हाला ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळेल.अंधारात ऑक्सिजन कमी उपलब्ध असल्यामुळे तो कमी मिळतो, कारण रात्री झाडे कार्बन डायऑक्साइड सोडतात .आपल्या हाडांना मजबूत करण्यासाठी कॅल्शियम सोबतच विटामिन डी खूप आवश्यक असते .जर तुम्ही योग्य प्रमाणात ऊन तुम्हाला मिळाले तर शरीरात कॅल्शियम चा उपयोग योग्य पद्धतीने होऊ शकतो.

 सकाळी चालण्याचे सर्वसाधारण फायदे त्वचा चमकदार होते:

  •  हृदयाचा स्वास्थ्य चांगले राहते हृदयाचे स्वास्थ्य चांगले राहते.हृदयाची कार्यक्षमता वाढते. 
  •  मधुमेह नियंत्रित राहतो वजन कमी करण्यासाठी उपयोग उपयोग होतो. 
  • मेंदूची कार्यक्षमता वाढते झोप चांगली लागते.
  •  प्रतिकारशक्ती वाढते, थकवा दूर होतो शरीरात स्फूर्ती वाढते .सतत काम करून आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो
  • कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते .चरबीच्या गाठी कमी होण्यास मदत होते. रोज कमीत कमी एक तास पायी चालल्याने लठ्ठपणा कमी होतो.वजन कमी करायचे असल्यास व्यायाम प्रकार उत्तम आहे 
  • प्रतिकारशक्ती वाढते .कॅन्सर चे पेशंट नीट होतात. .नियमित चालल्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरपासून बचाव होतो
  • सर्व प्रकारच्या आजारांपासून मुक्त राहण्यासाठी उपयुक्त आहे .

चालले वेगाने चालण्याचे फायदे:

  • आठवड्यातून दोन तास चालल्याने ब्रेन स्ट्रोक शक्यता 30% कमी होते .
  • रोज 30 ते 60 मिनिटे पायी चालल्याने हार्ट अटॅक शक्यता कमी असते .
  • रोज 30 ते 40 मिनिटे पायी चालल्याने मधुमेहाचा धोका 29% कमी होतो . 
  • दिवसातून तीस मिनिटे पायी चालल्याने डिप्रेशन ची शक्यता 36 टक्के कमी असते .
  • सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो. हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्व सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळतील. हाडांची मजबुती ही चालल्यामुळे वाढते.
  • चालल्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायाम होतो.  चालल्यामुळे तणाव आणि चिडचिड पणा दूर होण्यास मदत होतो.चालण्यामुळे झोपही चांगली लागते . 
  • मन एकाग्र होण्यासाठी चिंतनासाठी ही  फायदेशीर ठरतील .
  • चालल्यामुळे शरीरातील जास्तीत जास्त उष्मांक जळते. चालल्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते .
  • दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होतो .
  • चालल्यामुळे पचनक्रिया सुधारते. पचनाचे विकार कमी होतात. नियमित चालल्यामुळे चयापचय संस्था सुधारते. चालल्यामुळे हृदयाची गती वाढते.नियमित चालण्याची सवय असणार्‍यांमध्ये हृदयविकाराचे मृत्यू होण्याचे प्रमाण 50 टक्केपेक्षा कमी असते .
  • नियमित चालल्याने फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते.
  • नियमित चालल्यामुळे पाठीचे दुखणे. नेहमी चालण्यामुळे कंबर मांड्या पायांचे स्नायू मजबूत होतात. 
  • हृदयरोग, मधुमेह, उच्चरक्तदाब, श्वासाच्या त्रासांवर नियंत्रण मिळवता येते.
  • अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते.
  • मोतीबिंदूची शक्यता कमी होते .

Comments

Popular posts from this blog

विरुद्धार्थी शब्द | Opposite words in Marathi

चल रे भोपळ्या टुणुक टुणुक | Chal Re Bhoplya Tunuk Tunuk |Marathi Stories For Kids