चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्यावर विशेष काळजी | Special care for wrinkles on the face

 

skin tightening

सौंदर्याला मारक ठरतात सुरकुत्या 

सगळ्यांनाच आपला चेहरा हेल्दी आणि चमकदार हवा असतो. परंतु जर आपल्या चेहऱ्यावर अगदी लहान वयातच सुरकुत्या पडल्या, तर कदाचित आपणास सकाळी उठून आरशात आपला चेहरा पाहणे देखील आवडणार नाही. म्हणूनच, आपणही आपल्या त्वचेची विशेष काळजी घेतली पाहिजे. ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या पडणार नाहीत. सुरकुत्या चेहऱ्यावर पडल्यावर विशेष काळजी ही घ्यावी लागते. (Definitely try this remedy to get rid of facial wrinkles)

 प्रदूषण, नैराश्य आणि हार्मोनल असंतुलन यामुळे कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. सुरकुत्या सौंदर्याला मारक ठरतात. त्यामुळे घालवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी बाजारातील खूप महागडे प्रॉडक्ट्स वापरले जातात. पण याचा कालांतराने दुष्परिणाम होऊ लागतो. अशावेळी सुरकुत्या घालवण्यासाठी नेमके काय करावे? तर स्वयंपाकघरातील हे पदार्थ सुरकुत्या कमी करण्यास मदत करतील आणि त्याचे काही साईड इफेक्ट्सही नाहीत. तर पहा कोणते आहेत ते पदार्थ...

 दूध 

-चेहऱ्यावरील सुरकुत्या गायब करण्यासाठी दूध अत्यंत फायदेशीर आहे. रात्री झोपण्याच्या अगोदर आपल्या चेहऱ्याला गायीचे कच्चे दूध लावा आणि रात्रभर तसेच ठेवा. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होण्यास मदत होते. हा उपाय आपण सतत एक महिना केला तर चेहऱ्यावरील सुरकुत्या गायब होतील. मात्र, हे दूध नेहमी ताजे आणि न गरम केलेले असावे.

 चंदन पावडर

-चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या घालवण्याचा चंदन पावडर फायदेशीर असते. चंदनाचा लेप चेहऱ्याला लावल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यास मदत होते. चंदनातील अॅन्टीबॅक्टेरीयल तत्त्व हे चेहऱ्यावर परिणाम करणारे बॅक्टेरीया नष्ट करतात आणि आपला चेहरा उजळवतात. -चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी ऑलिव्ह ऑईल फायदेशीर आहे.

-चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या घालवण्याचा चंदन पावडर फायदेशीर असते. चंदनाचा लेप चेहऱ्याला लावल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यास मदत होते. चंदनातील अॅन्टीबॅक्टेरीयल तत्त्व हे चेहऱ्यावर परिणाम करणारे बॅक्टेरीया नष्ट करतात आणि आपला चेहरा उजळवतात.

ऑलिव्ह ऑईल

-चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी ऑलिव्ह ऑईल फायदेशीर आहे. ऑलिव्ह ऑईलचा वापर करून आपण सुरकुत्यापासून मुक्त होऊ शकता. दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर संपूर्ण चेहऱ्याला ऑलिव्ह ऑईल लावा आणि काही वेळ चेहऱ्याचा मसाज करा आणि चेहरा धुवा. 

नारळ

-नारळाच्या दुधात अॅंटीऑक्सीडेंट आणि अॅंटीइंफ्लेमेटरी गुणधर्म भरपूर असतात. त्यामुळे सुरकूत्या दूर राहतात. यासाठी अर्धा कप नारळाच्या दूध कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. १० मिनिटे ठेवा आणि त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. हा उपाय आठवड्यातून तीनदा करा.

केळी

 -एका केळीला चांगल्या पद्धतीने मेश करुन घ्या. त्यात एक चमचा ऑलिव तेल टाका. या मिश्रणाला चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. 

-त्वचेसाठी केळं अतिशय उत्तम. यात अॅँटी एजिंग, व्हिटॉमिन ए आणि बी असल्याने त्वचा उजळण्यास मदत होते. पिकलेले केळं कुस्करा. त्यात मध आणि गुलाबजल घाला. त्यानंतर त्यात दही घाला. चेहऱ्याला पेस्ट लावण्यानंतर १० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करा. 

बटाटा

-त्वचेला टाईटनेस येण्यासाठी बटाटा उपयुक्त ठरतो. अर्धा बटाट्याचा रस काढा आणि कापसाच्या बोळ्याने चेहऱ्याला लावा. हा उपाय नियमित करा. ते शक्य नसल्यास आठवड्यातून ३ हा उपाय केल्याने महिन्याभरात फरक जाणवेल.

मध

-मधात एक नैसर्गिक स्वीटनर असते ते माईश्चराईजरचे काम करते. मधामुळे फक्त सुरकुत्या दूर होतात असे नाही तर त्यातील अॅंटीऑक्सीडेंटमुळे त्वचाही हेल्दी राहते.

-अनेकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. त्यामुळे सुंदर असलेला चेहरा खराब दिसायला लागतो. मात्र, तुमच्या स्वयंपाक घरात अशा काही गोष्टी आहेत ज्यांचा उपयोग करुन करुन तुम्ही चेहऱ्यावरील रेषा आणि सुरकुत्या दूर करु शकता...

अंडी 

-अंड्याच्या पांढऱ्या भागात एक चमचा लिंबूचा रस मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. त्यानंतर 20 मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुऊन घ्या. याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होत जातील.- एक चमचा कॉफी पाऊडर, एक चमचा दूध आणि एक चमचा मध यांचे मिश्रण करा. तयार झालेला लेप चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटानंतर साफ पाण्याने चेहरा धुऊन घ्या.

-एक चमचा कोरफडाच्या चिकट भागात अंड्याचा पांढरा भाग मिसळा. तयार झालेल्या मिश्रणाने चेहऱ्याची मालिश करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.

-अंड्यामध्ये मध मिसळा आणि दररोज चेहऱ्यावर लावा. हे आपल्या त्वचेला पोषण देईल तसेच एक आठवड्यात आपल्या चेहऱ्यावरही फरक दिसून येईल. सलग 25 दिवस हे केल्यानंतर, आपण दर दोन ते तीन दिवसांनी हे लागू शकतो. हे केल्याने आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यास मदत होते.

-अंडी खाण्याचे शौकीन आहात, तर या गोष्टी नक्की जाणून घ्या- एक चमचा साखरेमध्ये एक चमचा मध मिसळून लेप तयार करुन घ्या. या लेपाने चेहरा स्क्रब करा आणि 10 मिनिटानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.

-अंडी फेसपॅक वृद्धत्वाचा प्रभाव लपविण्यासाठी देखील कार्य करते. त्यामध्ये वृद्धत्व विरोधी गुणधर्म असतात. हा पॅक तयार करण्यासाठी 1 अंडे घ्या आणि त्यामध्ये 4 ते 5 थेंब तेल मिक्स करा. हे चांगले मिसळा आणि संपूर्ण चेहऱ्याला यावर लावा आणि कोरडे झाल्यावर थंड चेहरा धुवा.


डार्क चॉकलेट 

-डार्क चॉकलेट चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. डार्क चॉकलेट वितळवून चेहऱ्यावर , त्यानंतर 10 मिनिटांनी स्वच्छ पाण्याने चेहरा साफ करा. 

सफरचंदचा सिरका

-सफरचंदचा सिरका आणि मधाचे मिश्रण करुन चेहरा आणि मानेला लावा. त्यानंतर 10-15 मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.

-एक चमचा कोरफडाच्या चिकट भागात अंड्याचा पांढरा भाग मिसळा. तयार झालेल्या मिश्रणाने चेहऱ्याची मालिश करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.

 ग्रीन-टी 

-ग्रीन-टी अँटी ऑक्सिडेंट म्हणून काम करते. दररोज ग्रीन-टी मध्ये एक चमचा मध टाकून पिल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.

Comments

Popular posts from this blog

विरुद्धार्थी शब्द | Opposite words in Marathi

चल रे भोपळ्या टुणुक टुणुक | Chal Re Bhoplya Tunuk Tunuk |Marathi Stories For Kids