बाल मेंदू विकास उपक्रम | Child Brain Development Activites
![]() |
Sharp Mind |
*मुलांचा बौद्धिक विकास *
मुलांचा मानसिक विकास होण्यासाठी आई-वडील आणि घरातील वातावरण महत्त्वाची भूमिका निभावत असते. मुलांचा ज्या प्रकारे शारीरिक विकास होत असतो तशीच काळजी मुलांचा मानसिक विकास होताना घेणे गरजेचे आहे. आजच्या स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी मुले शार्प माइंडेड असणे अत्यंत गरजेचे झाले आहे. तुम्हाला देखील तुमच्या मुलांना शार्प माइंडेड बनवायचे स्वप्न असेल तर, त्यास आहारामध्ये पौष्टिक पदार्थ खाऊ घाला. आज आम्ही तुम्हाला तुमच्या मुलांना कशा पद्धतीने कुशाग्र बनवता येईल याबद्दलच्या टिप्स सांगणार आहोत.
बुद्धिला चालना देणारे खेळ:
मुलांचा बौद्धिक विकास होण्यासाठी त्यांच्यासोबत बौद्धिक खेळ खेळणे गरजेचे आहे. खेळ खेळण्याआधी त्याला नेमका खेळ कशा पद्धतीने खेळायचा आहे याबद्दल सविस्तर समजावून सांगा. त्याच्यासोबत तुम्ही देखील लहान होऊन खेळा. अशा खेळांमुळे मुलांची बौद्धिक कुशलता विकसित होण्यास मदत होईल.
प्रेम द्या:
एका शोधानुसार ज्या महिला त्यांच्या मुलांना अधिक प्रेम करतात त्या मुलांचा बौद्धिक विकास अधिक होतो.
पौष्टिक आहार:
मुलांच्या बौद्धिक विकासासाठी प्रेमाबरोबर पौष्टिक आहार देणे देखील गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही मुलांना हिरव्या भाज्या, फळे, दूध, अंडे हे पदार्थ देवू शकता. मुलांना कमीत कमी जंक फूड खाण्याची सवय लावा. मुलांना रोज सकाळी भिजवलेले बदाम खायला दिल्यास बुद्धी तल्लख होण्यास मदत होते.
योग्य झोप:
पौष्टिक आहाराबरोबर मुलांची योग्य झोप होणे देखील गरजेचे आहे. यामुळे मुलांचा बौद्धिक विकास होण्यास मदत होते.
वाचनाची सवय लावा:
वरील सर्व गोष्टींबरोबर मुलांना वाचनाची आवड लावणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे मुलांना वाचनाची आवड लावा. यामुळे मुलांच्या ज्ञानात वाढ होण्यास मदत होईल.
मुले जन्म घेतल्या क्षणीच शिकू लागतात. त्यांना योग्य आरोग्य संगोपन व पोषक आहार तसेच प्रेम, वात्सल्य, प्रोत्साहन व मानसिक पातळीवरील चालना मिळाल्यास ती उत्साहाने शिकतात आणि वाढतात.
प्रोत्साहन:
मुलांना खेळण्यास प्रोत्साहन दिले व त्यांचे कुतूहल जागृत ठेवले की त्यांची सामाजिक, भावनिक तसेच बौद्धिक पातळी वरील वाढ व विकास व्यवस्थित होतो.
अनुकरण :
मुले त्यांच्या जवळ असणाऱ्या व्यक्तींच्या वागण्याचे अनुकरण करून त्यानुसार वागतात.
मुलाची वाढ व विकास खुंटत असल्याचे धोक्याचे संकेत पालकांना व सगोपनकर्त्यांना ओळखता येणे आवश्यक आहे.
Comments
Post a Comment