पोटावरील चरबी कमी करा | Reduce belly fat

lose belly fat overnight
      Loss Belly Fat     

  

पोटातील चरबी कमी करण्यासाठी प्रभावी टिप्स 


1) भरपूर विद्रव्य फायबर खा :

विद्रव्य फायबर पाणी शोषून घेते आणि एक जेल बनवते जे आपल्या पाचन तंत्रातून जात असताना अन्न मंद करण्यास मदत करते. जास्त साखरयुक्त पदार्थ खाऊ नये.

2) ट्रान्स फॅट्स असलेले पदार्थ टाळा :

 सोयाबीन तेलासारख्या असंतृप्त चरबींमध्ये हायड्रोजन पंप करून ट्रान्स फॅट्स तयार होतात.


3)जास्त दारू पिऊ नका :

अल्कोहोलचे थोड्या प्रमाणात आरोग्यासाठी फायदे होऊ शकतात, परंतु जर तुम्ही जास्त प्याल तर ते गंभीरपणे हानिकारक आहे.अल्कोहोलचं (Alcohol) सेवन करण्याची सवय हा वजन कमी (Weight Loss) करण्यातील मोठा अडथळा आहे. दारू पिण्यानं पोट (Belly) आणि कंबरभोवती चरबी जमा होते. बहुतांश अल्कोहोलमध्ये साखरेचं (Sugar) प्रमाण अधिक असतं


4) उच्च प्रथिनेयुक्त आहार घ्या :

प्रथिने हे वजन व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्वाचे पोषक आहे.जास्त प्रथिने सेवन केल्याने  भूक कमी करते आणि परिपूर्णतेला प्रोत्साहन देते. पौष्टिक पदार्थ खा. प्रमाणापेक्षा अधिक वजन वाढते तेव्हा सर्वांत जास्त चरबी (Fat) साठते ती पोट, कंबर, मांड्या या भागांवर.


5) योग्य प्रमाणात पाणी प्या :

तुम्ही भरपूर पाणी पीत असाल तर तुम्हाला दीर्घ काळ भूक लागत नाही. जेवण करण्यापूर्वी पाणी आवर्जून प्यावं, त्यामुळं अन्नाची तलफ कमी होते आणि आपोआपच कॅलरीजचं प्रमाण कमी होतं. तुमच्या शरीराला आवश्यक तेवढं पाणी घेत नसाल तर आपल्या पोटावरील चरबी कमी करणं अवघड होतं


6)आपल्या तणावाची पातळी कमी करा :

ताणतणावामुळेही शरीरात कोर्टिसॉल हार्मोनचे प्रमाण वाढतं, ज्यामुळे पाचक क्रिया मंदावते आणि खाण्याची इच्छा वाढते. चयापचयाचा दर कमी असेल तर वजन कमी करणं अवघड जातं. अगदी व्यायाम करत असाल तरीही वजन कमी होत नाही. त्यामुळं वजन कमी करायचं असेल तर ताणतणावाचं व्यवस्थापन करणं आणि आवश्यक ती झोप घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.


7) अपुरी झोप आणि ताण वाढवतील वजन :

वजनवाढण्या मागचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे अपुरी झोप (Sleep). माणसाला किमान सात ते आठ तासांची शांत झोप आवश्यक असते. अपुऱ्या झोपेमुळे शरीरात कोर्टिसॉल हार्मोनचे (Cortisol Harmons) प्रमाण वाढते .


8) व्यायाम करणं सर्वांत महत्त्वाचं :

आजकाल शारीरिक कष्टांची कामे कमी झाली आहेत. अनेक लोक दिवसभर एका ठिकाणी खुर्चीत बसून काम करतात. त्यामुळे दिवसभर शरीराची फार हालचाल होत नाही. अनेकदा वेळेअभावी व्यायामही (Exercise) केला जात नाही. त्यामुळं शरीरातील कॅलरीज जाळल्या जात नाहीत. परिणामी चरबीचे थर आणि वजनही वाढत जाते. त्यामुळं दररोज व्यायाम करणं आवश्यक आहे.

पोट कमी करण्यासाठी नौकासन योग सर्वोत्तम आहे.एरोबिक व्यायाम करा .


9) रात्री उशिरा जेवू नये : 

उशिरा डिनर करणे हे पोटातील चरबी वाढण्याचं प्रमुख कारण आहे. रात्री झोपण्याच्या 2 तासाआधी जेवून घ्यावं. 


Comments

Popular posts from this blog

विरुद्धार्थी शब्द | Opposite words in Marathi

चल रे भोपळ्या टुणुक टुणुक | Chal Re Bhoplya Tunuk Tunuk |Marathi Stories For Kids