योग्य आहार आणि रोगप्रतिकारशक्ती | Proper Diet and Immunity

 

Nutritious food
Nutritious Food

पोषक अन्न / Nutritious Food

अन्न / Food :

सूत्र :- अद्यते अस्मै इति अन्नम् । 


अर्थ : - ज्याला खाल्ले जाते, ते ‘अन्न’ होय.


 ज्या द्रव्यांची चव आणि वास चांगला असून जे दिसायला आकर्षक आहेत अन् जे योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात खाल्ले असता पचन अन् शोषण झाल्यावर शरिराच्या पेशींची झालेली झीज भरून काढू शकतात, नवीन शरीरघटक निर्माण करू शकतात, शरिराला लागणारी शक्ती उत्पन्न करतात आणि मनाला तृप्ती अन् आनंद देतात, अशा द्रव्यांना ‘अन्न’ म्हणतात.

अन्नामुळे जीवन घडते तर पोषक अन्नामुळे उत्तम आणि सर्वार्थाने स्वस्थ (Healthy)  असे मानवी जीवन घडते. तुम्ही खाता त्याप्रमाणे तुमचे व्यक्तित्व (Personalityघडते. तुम्ही काय खाता, यापेक्षा तुम्ही काय खात नाही, हे महत्त्वाचे ठरते.

आजच्या स्पर्धेच्या, ताणतणावांच्या आणि प्रदूषणाच्या जगात आत्मविश्वासाने, उत्साहाने आगेकूच करायची असेल तर शरीर निरोगी ठेवावे लागेल. आहार संतुलित हवा. किमान ४० अन्नघटक (Food ingredientआहारात असावेत. धान्य, डाळी, भाज्या, फळे, दूध, दही, ताक, तेल तुपातून ते मिळतील. अन्न खाताना ते फक्त पोट भरणारे असू नये तर शरीर, मन, बुद्धी हे सर्व पोसणारे असावेत .

रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढण्यासाठी मुख्यत्वे (Nutrientsपोषकतत्वांची गरज असते. भरपूर भाज्या, फळे, अंकुरित द्विदल दूध, दही, ताक यातून ती पूर्ण होऊ शकते. प्रदूषणामुळे साथीचे तसेच पेशींचा ऱ्हास होणारे अनेक रोग उद्भवू शकतात. हे प्रदूषण हवा, पाणी आणि आवाजाने होते. याने होणाऱ्या रोगांमुळे पोषकतत्त्वांची जी कमतरता होते ती सुयोग्य संतुलित आहारानेच भरून काढायला हवी. म्हणजेच नंतर रोगप्रतिकारशक्ती पुन्हा वाढीस लागते. रोगाची सुरुवात होते त्याआधी बराच काळ लोटलेला असतो. रोग कधी एकाएकी किंवा एका रात्रीत होत नाही. या रोगांचे प्राथमिक कारण म्हणजे अन्नघटकांची कमतरता. सुयोग्य आहारात धान्ये, डाळी, भाज्या, फळे, दूध, दही, ताक, तेल, तूप या सर्व गोष्टी दर २४ तासाला घ्यायला हव्या. दिवसभरातून त्या विभागून घ्याव्यात. दुपारी व रात्री चौरस आहार तर सकाळी, संध्याकाळी हलका नाश्ता, दूध असणे महत्त्वाचे. हे सर्व घेऊनही अन्नघटकांची कमतरता होतेच. प्रत्येकाची रचना, मानसिक ताणतणाव, हवेतील प्रदूषण, आवाजाचे प्रदूषण, नोकरीमुळे होणारे त्रास, तसेच ताजे अन्न न मिळणे, ताजा भाजीपाला फळे, दूध न मिळणे, रिफाइण्ड वस्तूंचा जादा वापर या सर्वांमुळे अन्नघटकांची कमतरता होते.

योग्य आहाराबरोबर पाण्याचे प्रमाण सुद्धा शरीरात योग्य ठेवणे गरजेचे असते . त्याकरता दिवसभरातून आपल्या वजनाच्या तुलनेत पाणी प्यावे . म्हणजेच 20 किलो वजनास एक लिटर पाणी याप्रमाणे पाणी प्यावे . 

Comments

Popular posts from this blog

विरुद्धार्थी शब्द | Opposite words in Marathi