आरोग्यदायी पोषणतत्वे | Healthy Nutrients
Healthy Nutrition |
आरोग्य हीच खरी संपत्ती
अन्न ही मानवी जीवनाचे अस्तित्व टिकविण्यास आवश्यक अशी प्राथमिक गरज आहे. शरीराची वाढ होणे, झीज भरुन काढणे, (energy production) ऊर्जा निर्मिती, कार्यशक्ती या बाबी शरीराने उपयोग केलेल्या अन्नामुळे घडून येतात. त्यामुळे आहारात घेतलेले अन्न पोषणदृष्ट्या समतोल हवे. शरीरपोषण व संवर्धन यासाठी (protein) प्रथिने, (water) पाणी, (vitamins and minerals) जीवनसत्व व खनिज द्रव्ये ह्यांचा आवश्यक तेवढा पुरवठा व त्याचे योग्य प्रमाण आपल्या आहारात पाहिजे. कोणत्याही एकाच खाद्यपदार्थात हे सर्व घटक योग्य प्रमाणात मिळणे शक्य नसल्याने या सर्व घटकांचे सुयोग्य प्रमाण रोजच्या आहारात विविध पदार्थ समाविष्ट करुन साधले पाहिजे. अशा संमिश्र आहाराला समतोल आहार किंवा संतुलित आहार म्हणतात.
आहार ही माणसाची जगण्यासाठीची गरज ठरते. माणसाच्या वयाप्रमाणे आहाराचं प्रमाण भिन्न असतं. प्रौढ व्यक्तींसाठी आहाराचा समतोल साधणं सोपं असतं, परंतु मुलांसाठी थोडे कष्ट घ्यावे लागतात. माणसाच्या दैनंदिन आहारात (protein,) प्रथिनं, (fats) स्निग्ध पदार्थ, (carbohydrates) कार्बोहायड्रेट्स यांचा योग्य प्रमाणात समावेश गरजेचा ठरतो. मुलांच्या वाढीच्या काळात प्रथिनांची गरज जास्त असते. काही काळात (calcium) कॅल्शिअमची गरज वाढते. किशोरवयीन मुलांची मानसिक आणि शारीरिक वाढ लहान मुलांपेक्षा थोडी वेगळी असते. सोबतच भावनिक-सामाजिक बदलही होत असतात. योग्य आहार केवळ एक दिवस घेऊन चालत नसतो. आहाराचं समीकरण बालपणापासूनच टिकवून ठेवावं लागतं
Comments
Post a Comment