काळवंडलेल्या त्वचेवरील घरगुती उपाय | Home Remedies for Blackheads
Whitening Skin |
त्वचा काळवंडणे ची कारणे काय?
चिंता आणि तणावात वाढ, झोपेच्या बदलेल्या वेळा, गोडपदार्थ, खाण्याच्या प्रमाणात वाढ, प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचा अति प्रमाणात समावेश, कम्प्युटर आणि मोबाइल स्क्रीनमुळे हानिकारक किरणांच्या संपर्कात येणे, अवेळी खाणे, ड जीवनसत्त्वाची कमतरता, त्वचेची नियमित काळजी न घेणे, चुकीचे घरगुती उपाय.
हात काळे पडण्याची कारणे :
चेहर्यापेक्षा हात जास्त काळे होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत:-
गंदगी, धूळ आणि प्रदूषण .
सूर्याची अल्ट्रावायलेट किरणे .
हातातील त्वचेत ओलाव्याची कमतरता .
त्वचेची व्यवस्थित स्वच्छता न ठेवणे .
हायपर पिग्मेंटेशन किंवा मेलेनिन मुळे त्वचा काळी होते .
हात गोरे होण्यासाठी उपाय :-
* नियमित पद्धतीने आंघोळीला जाण्याआधी हात आणि पायांना स्वच्छ कपड्याने चोळून घ्यावा. असे केल्याने त्वचेवर असलेल्या सर्व मृत कोशिका निघून जातात.
* आंघोळीच्या अर्धा तास आधी नारळाचे तेल हात आणि कोपरावर लावावे.
* दररोज अंघोळ करतांना हात व शरीरावरील सर्व अवयवांना जाळी आणि साबणाने स्वच्छ करावे.
* हातांचा काळेपणा उन्हामध्ये काम केल्याने किंवा जास्त वेळ बाहेर फिरल्याने होतो. म्हणून उन्हात बाहेर जाण्याआधी हातांना व्यवस्थित झाकावे. याशिवाय तुम्ही सन क्रीम चा वापर देखील करू शकता.
पुढे हात गोरे होण्यास…
ऑलिव्ह ऑइल आणि साखर
सौंदर्यप्रसाधनात ऑलिव्ह ऑईल चा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. ऑलिव्ह ऑइल हातावरील काळेपणा दूर करण्यासाठी उपयोगी आहे. याचे जास्त फायदे मिळवण्यासाठी 3 चमचे ऑलिव्ह ऑईल मध्ये कुटलेली साखर मिसळून याला दोन्ही हातांवर लावा. याच्या 20 मिनिटानंतर थंडगार पाण्याने हात धुवून घ्या.
हळद, नारळाचे तेल आणि कोरफड
हळद ही जखमेवर अतिशय प्रभावी औषध आहे परंतु तिचा उपयोग सौंदर्यप्रसाधनात केले मोठ्या प्रमाणात केला जातो. कोरफड च्या जेल मध्ये ऑंटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात.
हळद, नारळ तेल आणि कोरफड चे पॅक बनवण्यासाठी. दोन ते तीन चमचे हळद वाटीभर उकळलेल्या पाण्यात टाका. आता यात 2 चमचे एलोवेरा (कोरफड) जेल आणि तीन मोठे चमचे नारळाचे तेल टाका. यानंतर हा लेप दोन्ही हातांना लावा. आपण हा लेप गुडघे आणि पायांवर ही लावू शकता. लेप सुकल्याच्या एक तासानंतर थंड पाण्याने धुवून घ्या.
दूध आणि संत्रीची साल
संत्र्याच्या सालीत ब्लीचिंग गुणधर्म असतात. हे गुणधर्म त्वचेवरील काळेपणा दूर करून तिला चमक प्रदान करतात. यासाठी तुम्हाला संत्र्याची सुकलेली साल मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायची आहे, सालीच्या या पाऊडर मध्ये दूध मिसळून हातांना लावून 20 मिनिटांनी हात धुवून काढल्याने याचे त्वचेवर अनेक लाभ होतात.
तर हे होते हात गोरे होण्यासाठी उपाय, वरील उपयांच्या नियमित वापरणे आपण आपल्या हातांचा रंग आधी पेक्षा नक्कीच सुधारू शकतात.
मग खूप काही करूनही डाग निघत नाही, चेहरा छान दिसतो, पण मान काळी दिसत असल्याने चिंता वाटते, तेव्हा यावर काही घरगुती उपाय केले, तर ही समस्या सोडवता येते.
कोणत्या महिलेला सुंदर दिसायला आवडत नाही. आणि त्यासाठी आपण पार्लरमध्ये जाऊन बरेच उपाय करतो. पण तुम्ही कधी तुमच्या हातांकडे लक्ष दिलंय का? तुम्हाला तुमच्या हाताची त्वचा सुंदर, चमकदार हवी आहे, तर मग हे सहा घरगुती उपाय करा.
बटाट्याचा रस
बटाट्याच्या रसाने त्वचेचा रंग हलका होतो. कच्चा बटाटा किसून मानेवर लावावा. किंवा किसलेल्या बटाट्याचा रस आणि लिंबाचा रस मिसळून मानेवर लावा आणि 20 मिनिटाने गार पाण्याने धुवावा.
बेकिंग सोडा
बेकिंग सोडा मानेवरील काळी परत हटविण्यास प्रभावी ठरेल. आपल्याला 1 चमचा पाण्यासोबत 2 चमचे बेकिंग सोडा मिसळून आपल्या मानेवर लावायचे आहे. नंतर हे वाळल्यावर पाण्याने धुऊन टाका. ही प्रक्रिया आठवड्यातून दोनदा अमलात आणा.
कोरफड
कोरफड त्वचेला उत्तम रिझल्ट देतं. कोरफडीचा रस मानेवर लावून अर्धा तास राहू द्या. नंतर पाण्याने मान धुऊन टाका. हे क्रम रोज करा आपल्या उत्तम परिणाम हाती लागतील.
Comments
Post a Comment