डोळ्याचे आरोग्य | Eye Health

Natural Beauty Eyes
    Natural Eye   

 डोळ्याची निगा - डोळ्याच्या तक्रारी - उपाय

  गेल्या काही वर्षात संगणकावर काम केल्याने, प्रदूषणामुळे डोळ्याच्या तक्रारी सातत्याने वाढत्या आहेत. डोळे दुखणे, चुरचुरणे, लाल होणे, डोळ्यांची आग होण्याचा त्रास होतो. मात्र डोळ्यांची काळजी घेतली जात नाही. शांतपणे डोळे बंद करून बसणं गरजेचं असतं, त्यामुळे डोळ्यांचं स्वास्थ्य सुधारतं. पण या साध्या मात्र अतिशय महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे डोळ्यांचे आजार व त्यांच्याशी संबधित समस्या वाढत आहेत.प्रदूषण, धूळ, मातीमुळे डोळ्यांचे आरोग्य बिघडते. कमी वयात चष्मा लागतो, डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात, पापण्यांवर सूजही येते. डोळ्यांचे आरोग्य जपणे महत्त्वाचे असते. पापण्यांवर सूज येणे, डोकेदुखी यासारख्या आजारांचे प्रमाण मागील काही वर्षांमध्ये वाढते आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात तरुणाईला स्वास्थ्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो.

 हे टाळा :

लहान मुलांना उन्हाळ्यात काजळ लावू नये. महिलांनी चेहऱ्यावर कॉस्मेटिक वापरताना ते डोळ्यात जाणार याची काळजी घ्यावी. फूटपाथवर गॉगल्सची विक्री केली जाते. मात्र, हे गॉगल्सची काच ही डोळ्याला घातक असते. त्यामुळे गॉगल स्वस्त मिळत असेल तरी ते वापरू नयेत. डोळ्यात स्वतःचं कोणतेही औषध घालू नये, डोळ्यांमध्ये काही गेल्यास डोळा चोळू नये. डोळे दोन वेळा थंड पाण्याने हबका मारुन धुतले तर त्यामुळे डोळ्यांना गारवा मिळतो.

कमी वयात चष्मा लागणे, डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे तयार होणे , तसेच पापण्यांवर सूज येणे, डोळ्याची जळजळ होणे, डोकेदुखी यासारख्या डोळ्यांशी संबंधित आजारांचे प्रमाण गेल्या काही काळापासून वाढले असल्याचे जाणवते. वेळेत लक्ष दिले नाही तर या समस्या अधिक धोकादायक ठरू शकतात. कम्प्युटर किंवा टीव्हीसमोर आपण बसतो तेव्हा डोळ्यांवर जास्त ताण पडतो. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बाहेर पडणारे विद्युततरंग नाजूक डोळ्यांना हानी पोहचवतात. त्याने आपल्या मेंदूवरही तणाव येतो. याव्यतिरिक्त प्रदूषण, धूळ, माती आदीपासून डोळ्यांना हानी पोहचते. यावर मात करण्यासाठी काही उपाय अवलंबता येतात. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे डोळे लाल होतात. डोळ्यात धूळ, कचरा जाण्याची शक्यता असते. चष्म्याचाही फारसा उपयोग होत नाही. लहान वयात चष्मा लागणं, लहान वयातच मोतिबिंदू होणं, डोळे कोरडे पडणं, डोळ्यांतून सतत पाणी येणं, डोळे लाल होणं, डोळ्यांच्या तक्रारींमुळे डोकं दुखणं अशा तक्रारी निर्माण होतात.

 जपा डोळ्यांचे 👀आरोग्य:

  आपण दररोज डोळ्यांची काळजी घेण्याच्या सवयींचा सराव केल्यास डोळ्याच्या अडचणी सहज टाळता येतात. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच अत्यंत महत्वाच्या सवयींकडे सर्वात जास्त दुर्लक्ष केले जाते. आपले डोळे आपल्या आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग आहेत. आपल्या डोळ्याचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आणि दृष्टी दृढ ठेवण्यासाठी, आपल्या रोजच्या नित्यकर्माचा भाग असावा त्यासाठी डोळ्यांची निगा व काळजी घेतली पाहिजे.

* जीवनसत्व ए  / Vitamin A : जीवनसत्व ए हे मेदामध्ये विरघळणारे जीवनसत्व आहे, जे काही पदार्थांमध्ये नैसर्गिकरीत्या आढळून येते. तसेच ते काहीवेळा  प्रोव्हिटॅमिनमधूनही मिळते. जीवनसत्व ए ला रेटिनोलसुद्धा म्हणतात, कारण ते डोळ्यांचा पडदा बनवणाऱ्या रंगद्रव्यांच्या निर्मितीसाठी फायदेशीर असते. आंधळेपणाचे सगळ्यात सामान्य कारण जीवनसत्व ए चा अभाव आहे. गाजर, बीट, रताळे, मटार, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या, आंबे, टरबूज, पपई, पनीर, राजमा, अंडे, बिन्स यामध्ये जीवनसत्व ए भरपूर प्रमाणात असते.

* जीवनसत्व सी / Vitamin C : जीवनसत्व सी एक चांगले अँटीऑक्सिडंट आहे, त्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. पुरेशा प्रमाणात जीवनसत्व जर आहारात असेल तर मोतीबिंदू होण्यापासून वाचता येऊ शकते. व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असलेल्या खाद्य पदार्थांमध्ये ब्रोकोली, मोड आलेली कडधान्ये, मिरे, हिरव्या पालेभाज्या, आंबट फळे, आणि पेरू यांचा समावेश होतो.

* जीवनसत्व ई / Vitamin E  : जीवनसत्व ई च्या अभावाने अंधुक दिसणे, आंधळेपणा, मोतीबिंदू होऊ शकते. म्हणून आहारात जीवनसत्व ई असलेले पदार्थ खाणे चांगले. बदाम, अक्रोड, शेंगदाणे, सूर्यफुलाच्या बिया अळशीचे तेल, पालक, ब्रोकोली, ऑलिव्ह तेल या सर्वांमध्ये जीवनसत्व ई असते.

* ओमेगा-3 फॅटी ॲसिड / Omega -3FatiAcid  : ओमेगा-3 फॅटी ॲसिड जर योग्य प्रमाणात असेल तर प्रौढांना स्नायूंची हानी आणि डोळे कोरडे होणे यापासून सुटका मिळते. डोळ्यांच्या स्नायूंची हानी ही एक मोठी समस्या आहे. त्यामुळे अंधुक दिसू लागते. तर डोळ्यात योग्य प्रमाणात अश्रू निर्माण न झाल्याने डोळे कोरडे होतात त्यामुळे डोळ्याचा ओलावा कमी होऊन चिकटपणा कमी होतो. मासे, टूना मासे, शेंगदाणे, अळशीचे तेल , कॅनोला तेल यात ओमेगा-3 फॅटी ॲसिड असते.

* जस्त / Zinc  : जस्त हे डोळ्यात असणारे महत्त्वाचे पोषक द्रव्य आहे. हे मेलानिनच्या निर्मितीत मदत करते जे डोळ्यांच्या रंगद्रव्यांपैकी एक आहे. जस्ताची कमतरता रातांधळेपणाला कारणीभूत ठरू शकते. रेड मीट आणि कोंबडी हे त्याचे उत्तम स्त्रोत आहेत. तसेच ते नैसर्गिकरित्या शेंगदाणे , लसूण , तीळ , राजमा, डाळी सोयाबीन, अळशी, बदाम, गहू, अंड्यातील बलक यात आढळून येते.



Comments

Popular posts from this blog

विरुद्धार्थी शब्द | Opposite words in Marathi

चल रे भोपळ्या टुणुक टुणुक | Chal Re Bhoplya Tunuk Tunuk |Marathi Stories For Kids