कोरोनाग्रस्त व्यक्तींचा आहार | Diet Of Coronary Heart Disease


diet for heart
   Healthy Diet   


कोरोनावर मात करण्यासाठी आहारामध्ये घेण्याची विशेष  दक्षता 

 आहाराबाबत या गोष्टींची काळजी घ्या ;

1) रोज ताजं आणि प्रक्रिया न केलेलं अन्न सेवन करावं .

दररोज फऴं, हिरव्या पालेभाज्या, डाळी, बीन्स (Beans), धान्य, मांस (Meat), मासे, अंडी आणि दुधाचं सेवन करावं.

दररोज 2 कप फळांचा रस, 2.5 कप भाजी, 108 ग्रॅम धान्य, 160 ग्रॅम मांस किंवा बीन्सचे सेवन करावं.आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा रेडमिट (Red Meat) तर 2 किंवा 3 वेळा चिकन (Chicken) खावं.नाश्त्यात साखर, मीठ, फॅटयुक्त पदार्थांचं सेवन करू नये. त्याऐवजी फळं खावीत.

 सर्वच कोरोना रुग्णांना Plasma therapy देणं गरजेचं आहे ?

भाज्यांमध्ये पोषक तत्वे( Nutrients ) कायम राहावी यासाठी त्या जास्त शिजवू नये.

2) भरपूर पाणी प्यावं .

दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्यावं. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघेल. याव्यतिरिक्त ताज्या फळांचे ज्युस, लेमन ज्युस प्यावं. कॅफिन, हार्ड आणि सॉफ्ट ड्रिंक्संचं सेवन टाळावं.

3) ठराविक प्रमाणातच चरबी (Fat) युक्त पदार्थांचा वापर करावा.

सॅच्युरेटेड फॅटऐवजी अनसॅच्युरेटेड फॅटसचा वापर करावा. रेड मीटऐवजी चिकन, व्हाईट मीट किंवा मासे यांचं सेवन करावे. प्रक्रियायुक्त मांसाचं सेवन टाळावं. कमी फॅटचं दूध वापरावं. फास्ट फूड (Fast Food), स्नॅक, फ्राईड फूड, फ्रोजन (Frozen), पिझ्झा, कुकीजचा वापर टाळावा.

4) मीठ आणि साखरेचा अधिक वापर टाळावा.

खाद्य पदार्थ तयार करतेवेळी मिठाचा वापर कमी प्रमाणात करावा. सॉसचा वापर टाळावा. रोज एक चमचा मिठाचं सेवन पुरेसं आहे. गोड कुकीजचे (Cookies) सेवन टाळा. कोल्ड ड्रिंक(Cold Drink), पॅक्ड ज्यूसचा वापर कटाक्षानं टाळावा.

5) बाहेरील पदार्थ खाणं टाळा.

दोन व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात आल्यास कोरोनाचा संसर्ग पसरतो. त्यामुळे बाहेर जाऊन पदार्थ खाणं टाळावं. बाहेरील अस्वच्छ अन्नपदार्थांचे सेवन टाळा. शक्य असेल तितके घरच्या पदार्थांचं सेवन करा.

6) मानसिक आरोग्य सांभाळा.

रुग्णांनी स्वतःचे मानसिक आरोग्य सांभाळावे . मानसिकरीत्या खचून न जाता पूर्ण आत्मविश्वासाने या आजारावर मात करावी . तसेच कुटुंबातील इतर सदस्यांनी देखील कोरोनाग्रस्त  व्यक्तीचे मनोबल वाढवावे . घरामध्ये आनंददायी वातावरण ठेवावे . घाबरून न जाता सर्व उपचार तसेच पोषक आहार(Nutritious diet) घेत रहावा .

जे लोक किंवा ज्यांचं कुटुंबं कोरोनाशी लढतं आहे त्यांना पोषक आहाराबरोबरत्यामुळे लोकांनी आपल्या दैनंदिन आहारात व्हिटॅमिन(vitamins), खनिज (minerals), तंतुमय पदार्थ(Fibrous substance), प्रोटिन (proteins)आणि अँटिऑक्सिडेंटचा  (antioxidant)समावेश केला पाहिजे. तसंच आपलं वजन वाढणार नाही, हृदयरोग किंवा मधुमेह होणार नाही याची काळजी घ्यावी.

Comments

Popular posts from this blog

विरुद्धार्थी शब्द | Opposite words in Marathi