वांग त्वचेसाठी सर्वोत्तम उपचार | Best treatment for Melasma
Cure Melasma |
चेहऱ्यावरील वांग व घरगुती उपाय:
(Wang on the face and remedies on it)
अनेकांच्या चेहऱ्याला वांग या त्वचेच्या समस्येचा सामना करावा लागतो. ज्यामुळे चेहऱ्यावर डाग दिसू लागतात. पण चिंता अजिबात करू नका. आज आम्ही तुम्हाला वांगच्या समस्येपासून सुटका करण्याचे काही घरगुती आणि रामबाण उपाय सांगणार आहोत.
लिंबू -
वांगच्या समस्येवर लिंबू हा एक चांगला घरगुती उपाय आहे. चेहऱ्यावर लावण्यासाठी एक चमचा लिंबाचा रस आणि मध घ्या आणि तो मिक्स करा. हे मिश्रण प्रभावित जागांवर लावा. किमान 15 मिनिटं चेहऱ्यावर तसंच राहू द्या आणि कोमट पाण्याने धुवून टाका. तुम्चाला फरक जाणवत नाही तोपर्यंत हे मिश्रण दररोज लावत रहा.
बटाटा -
एक कच्चा बटाटा अर्धा कापून घ्या. आता या कापलेल्या बटाट्यावर पाण्याचे काही थेंब टाका आणि प्रभावित त्वचेवर लावा. ते 10 मिनिटं सुकू द्या आणि मग कोमट पाण्याने धुवून टाका. असे महिन्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळा करा.
कोरफड -
चेहऱ्यावर कोरफड लावताना सर्वात आधी एका बाऊलमध्ये मध आणि कोरफड मिक्स करा आणि मिश्रण 10 मिनिटं सेट होऊ द्या. हे मिश्रण जेव्हा सेट झाल्यावर ते चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटं तसंच राहू द्या. सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. तुम्ही हा उपाय आठवड्यातून दोनदा करा. तुम्हाला फरक नक्की जाणवेल.
दही -
एका वाटीमध्ये दही घ्या आणि ते त्वचेवरील प्रभावित जागी लावा. 20 मिनिटं चेहऱ्यावर तसंच राहू द्या. जोपर्यंत ते सुकत नाही. सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि कोरड्या कपड्याने पुसून घ्या. केळ - केळ कुस्करून घ्या. त्यात दूध आणि मध घाला. चांगलं मिश्रण होईपर्यंत मिक्स करा. हे मिश्रण वांग प्रभावित भागावर लावा. किमान 30 मिनिटं तसंच राहू द्या आणि मग चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. हे उपाय करा आणि आपला चेहरा फ्रेश आणि चमकदार बनवा.
वांगपासून बचावासाठी:
1) तुम्ही मुख्यतः सूर्यप्रकाशात जाताना किंबहुना घराबाहेर पडताना चेहरा आणि शरीराचा जो भाग सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणार आहे. त्याला न विसरता सनस्क्रिन लावा.
2) वांगपासून सुरक्षेसाठी शारिरीक स्वच्छताही तितकीच महत्त्वाची आहे. कधीही तुमचे हातपाय धुताना चेहऱ्याला हात लावणं टाळा.
3) जास्त गरम पाण्याने आंघोळ करणं टाळा. याऐवजी तुम्ही कोमट पाण्याने आंघोळ केल्यास कधीही उत्तम ठरेल.
4) रोजच्या रूटीनसोबत प्रॉपर स्किन केअर रूटीनही फॉलो करा. आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा त्वचा एक्सफॉलिएट करायला विसरू नका.
5) जर तुम्ही जास्त प्रमाणात ब्लीचिंग करत असाल तर ते टाळा. कारण ब्लीचिंगमुळे जास्त प्रमाणात पिगमेेंटेशनची समस्या निर्माण होते. जर तुम्हाला ब्लीच करायचंच असेल तर त्यासाठी टोमॅटो किंवा लिंबू यासारख्या नैसर्गिक ब्लीचचा वापर करणं कधीही चांगलं असतं.
6) वांगपासून बचावासाठी चेहऱ्याला तीन चार दिवसात एकदा स्क्रब करा. यासाठी तुम्ही मुलतानी मातीचा वापर आवर्जून करावा. मुलतानी माती त्वचेतून जास्त प्रमाणात उत्सर्जित होणाऱ्या तेलाला कंट्रोल करते. त्यामुळे याचा उपयोग फेसपॅक म्हणूनही करू शकता.
7) घरातून बाहेर पडताना न विसरता सनस्क्रीन लावा.
8) जेवढं शक्य असेल तेवढं पाणी प्या. कारण डिहायड्रेशनमुळेही तुमचा चेहरा थकलेला आणि कोमजलेला दिसतो. त्यामुळे दिवसभरात किमात 9-10 ग्लास पाणी नक्की प्या. यामुळे तुमची त्वचा तजेलदार आणि डागविरहीत राहील.
Comments
Post a Comment