डोक्यातील कोंड्यावर सर्वोत्तम उपाय | Best Dandruff Remedies

improve  to hair health
      Healthy hair and growth     


केसांचे आरोग्य  : 

डोक्यातील कोंडाची कारणे काय आहेत? कोंडा उपाय शोधण्यासाठी विविध कारणे असू शकतात, परंतु कोंडा होण्याची ही सर्वात सामान्य कारणे आहेत:

चहाच्या झाडाचे तेल चहाच्या झाडाच्या तेलामध्ये सूक्ष्मजीवविरोधी आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे डोक्यातील कोंडा निर्माण करणाऱ्या बुरशीच्या विरूद्ध प्रभावी ठरू शकतात. हे संवेदनशील आणि चिडचिडीत त्वचा शांत करण्यात देखील यशस्वी आहे, अशा प्रकारे घरी कोंडा काढून टाकण्याची एक प्रभावी पद्धत आहे.

केसांमध्ये कोंडा झाल्यास खाज येऊ लागते. केसांच्या त्वचेवर अधिक खाजवल्यास जखमाही होऊ शकतात. यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात. केसांमध्ये कोंडा आणि खाज दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. 

कोंडा दूर करण्याचे सोपे उपाय

 * कोरफडाच्या रसाने केसांना मसाज करा आणि एका तासाने केस धुवा. असे केल्याने कोंड्याची समस्या दूर होते.

* नारळाच्या तेलात कापूर मिसळून ठेवा. आंघोळ करण्याआधी केसांना या तेलाने मसाज करा. नियमितपणे हे केल्याने कोंड्याची समस्या दूर होते. 

* पाणी आणि व्हिनेगर समप्रमाणात मिसळून केसांना लावा. यामुळे कोंडा दूर होईल.

* कडुनिंबाची पाने नीट वाटून घ्या आणि त्याची पेस्ट बनवा. हा लेप केसांना लावा. थोड्या वेळावे केस धुवा.

* कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी नियमितपणे केस विंचरणे महत्त्वाचे असते. यामुळे केसांच्या मुळातून तेल निघते. याशिवाय केस नियमित विंचरल्याने केसांची वाढही होते. 

* कोंडा झाल्यास चांगल्या प्रतीचा शाम्पू वापरावा. अशा हेअर प्रॉडक्टचा वापर करा ज्यामध्ये झिंक पॅराईथिन असते. कोंडा दूर करण्यासाठी हा घटक महत्त्वाचा ठरतो. 

* एक ग्लास पाण्यात चार चमचे बेसन मिसळून पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट केसांना लावून एक तास ठेवा त्यानंतर केस धुवा. हा उपाय साधा आणि फायदेशीर आहे.

* दोन चमचे बेकिंग सोडा आणि दोन चमचे पाणी एकत्र मिसळा. हे मिश्रण केसांना लावून १५ मिनिटांनी केस धुवा. यामुळे केसातील कोंडा दूर होण्यास मदत होईल




Comments

Popular posts from this blog

विरुद्धार्थी शब्द | Opposite words in Marathi

चल रे भोपळ्या टुणुक टुणुक | Chal Re Bhoplya Tunuk Tunuk |Marathi Stories For Kids