संतुलित आहार |Balanced Diet|Healthy Foods
Balanced Diet |
हे करून बघा आणि स्वतःचे आरोग्य सांभाळा.
सकाळचा नाश्ता
सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास नॉर्मल पाणी घ्या. त्यानंतर फ्रेश झाल्यानंतर परत एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी, भिजलेले बदाम पाच नंतर अर्धा ते पाऊण तास वर्क आउट करा. दहा मिनिटांनी प्रोटीन युक्त नाश्ता घ्या .त्यामध्ये प्रोटीनयुक्त असलेले बदाम , पनीर, अंडी, मोड आलेले धान्य ,सफरचंद (आवडीचे फळ ) पाल्या भाज्या चवीनुसार, प्रथिने पावडर एक चमच .
दुपारचे जेवण
दुपारच्या जेवणात सुरुवातीला एक प्लेट्स सलाड काकडी ,टोमॅटो वरतुन थोडसं लिंबू टाकले तरी चालेल सलाड खाऊन झाल्यावर संपूर्ण थाळीचे जेवण-त्यामध्ये वरण-भात, पोळी -भाजी, चटणी ,लोणचे ,भाजलेले पापड या पद्धतीने पूर्ण जेवण घ्या. जेवण झाल्याच्या नंतर एक वाटी दही अथवा एक ग्लास ताक घ्या.
जर तुम्ही सायंकाळी 4-5 या दरम्यान चहा घेत असाल तर फक्त चहा न घेता त्याबरोबर ड्रायफ्रूट्स घ्या. ड्राय फ्रुट्स भिजवलेली असतील तर छान नसले तरी चालेल .
रात्रीचे जेवण
रात्रीच्या जेवणा मध्ये सुरुवातीला सलाड एक प्लेट भरून ; तुम्ही काकडी, गाजर, टोमॅटो,फळ याप्रमाणे आवडीचे सलाड घेऊ शकता .जेवणामध्ये कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ कमी करा . उदा . भात -पोळी याचे प्रमाण कमी करून पालेभाज्या, फळभाज्या प्रथिनेयुक्त पदार्थ चिकन ,अंडी, पनीर, मोड आलेली धान्य या प्रमाणे तुम्ही कोणतेही पदार्थ घेऊ शकता. यानंतर झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधाचा घ्या. त्याबरोबर दोन बदाम खा. या पद्धतीने तुम्ही जर तुमचा डाएट रोज घेतला तर निश्चितच तुमचे आरोग्य हे स्वस्थ राहील. त्या बरोबर पचनाच्या कोणत्या तक्रारी राहणार नाही. ही मसालेदार व तळलेले पदार्थ पोटात जात नसल्यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहील जेवणाच्या या सुधारित शैलीचा जर वापर नियमित केला तर निश्चितच कोणतेच रोग आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होणार नाही.
आपल्या वजनाप्रमाणे पाण्याचे प्रमाण ठेवा जर वजन 60 किलो असेल तर तर दिवसातून तीन लिटर पाणी निश्चितच प्यावे .
आरोग्य हि संकल्पना अत्यंत व्यापक अर्थाने उपयोगात आणली जाते. आरोग्य म्हणजे स्थूल मानाने शारीरिक, मानसिक, सामाजिक, संतुलनाची स्थिती होय. आरोग्यास असंतुलन निर्माण झाल्यास रोग जडतात. जी व्यक्ती आपली सामाजिक भूमिका सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी शारीरिक, मानसिक, दृष्ट्या सक्षम असते, ती आरोग्यसंपन्न मानली जाते. म्हणून कार्यात्मक योग्यता हा स्वास्थ्याचा मुख्य निकस आहे.
पालेभाज्या घ्या या सुखी आरोग्य ठेवा.
निरोगी शरीर हाच खरा दागिना.
आपल्या चांगल्या आरोग्याची समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पडत असते त्यामुळे चांगल्या आहार-विहारानेआणि स्वतःला नेहमी ताजेतवाने ठेवा.
Very nice your son
ReplyDelete