टाचा दुखी | Heels Pain


heels pain
    Heals Bone Pain   


टाचदुखीवर काही घरगुती उपाय

आजकालची जीवनशैली अतिशय धावपळीची आणि गुंतागुंतीची आहे. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. धावपळीमुळे पाय दुखणे, तळवे, टाचा दुखणे किंवा त्यांना सुज येणे अशा समस्या उद्भवतात. तर कधी खूप वेळ उभे राहील्याने, वजन अधिक असल्यास किंवा चूकीचे चप्पल, बूट घातल्यास टाचा दुखी लागतात. मात्र हे दुखणे अतिशय असह्य होते. या घरगुती उपयांनी टाचांच्या दुखण्यावर आराम मिळेल.

 शरीराचा भार पेलता यावा यासाठी पायाच्या तळव्यांची रचना वक्राकार पद्धतीने करण्यात आली आहे. चालणं हा शरीरासाठी उत्तम व्यायाम आहे. मात्र अनेकांना टाचदुखी किंवा तळवे दुखीची समस्या असते. त्यामुळे अनेक वेळा चालताना किंवा उभं राहिल्यावर ही समस्या तीव्रतेने जाणवते. चालत असताना शरीराचा भार गुडघे, पावले आणि पायांच्या तळव्यावर येतात. शरीराचा भार पेलता यावा यासाठी पायाच्या तळव्यांची रचना वक्राकार पद्धतीने करण्यात आली आहे. या तळव्यांमध्ये प्लान्टर फेशिया हा स्नायूंचा पडदा असतो. या प्लांटर फेशियाला इजा होऊन लहान भेगा (मायक्रो टियर्स) निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हे स्नायू घट्ट होतात आणि टाचदुखी सुरू होते साधारणत: चाळिशी ओलांडलेल्या स्त्रियांमध्ये टाचदुखीची समस्या सर्वाधिक असल्याचं पाहायला मिळतं. या टाचदुखीवर काही घरगुती उपाय आहेत, ज्यामुळे ही समस्या दूर होऊ शकते.

 1) टाच दुखत असताना कोमट पाण्यामध्ये खडे मीठ टाकावे आणि या पाण्यामध्ये १५ ते २० मिनीटे पाय टाकून बसावे. या पाण्यामुळे पायांना शेक मिळाल्यानंतर टाचदुखी काही प्रमाणात कमी होते.

2)टाचदुखी हा वाताचा एक प्रकार आहे. त्यामुळे अनेक वेळा हिवाळा किंवा पावसाळा या ऋतूंमध्ये टाचदुखीची समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवते. त्यामुळे घरामध्ये असताना कायम मऊ चपल किंवा स्लीपरचा वापर करावा.

3)फिजिओ थेरेपीचे काही सोपे व्यायाम, एक्सरसाईज असतात ते करावेत. यामध्ये भिंतीला हात टेकवून पायाच्या बोटांवर उभं राहावं आणि टाचा वर उचलाव्यात. या अशा स्थितीमध्ये जागच्या जागी जॉगिंग करायचा प्रयत्न करावा.

4) या व्यायाम प्रकारातील सोपा प्रकार म्हणजे पायाच्या बोटांनी टॉवेल जवळ आणण्याचा प्रयत्न करणे. यामध्ये जमिनीवर टॉवेल पसरावा आणि त्यावर पाय ठेवून पायांच्या बोटांच्या मदतीने टॉवेलचं एक टोक आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न करणे

5) विटेचा एक तुकडा थोडासा गरम करुन त्यावर रुईचे पान बांधावे आणि त्याचा शेक टाच दुखत असलेल्या भागावर द्यावा.

6) गोडेतेल आणि मीठ एकत्र करुन हा लेप टाचेवर लावाला आणि टाच सुती कापडाने बांधून ठेवावी.

7) सैंधव मीठ हा एक प्रभावी घरगुती उपाय आहे. जो पायाच्या दुखण्यावर तुम्हाला तत्काळ आराम मिळवून देतो. गरम पाणी एका टबमध्ये घ्या आणि त्यात 2-3 चमचे सैंधव मीठ घाला. या पाण्यात तुमचे पाय 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवा.

पाय स्वच्छ ठेवणे.

गरम पाण्याने पाय शेकणे.

गरम पाणी, आहारात साजूक तुप प्रमाणात घ्यावे.

आंबट, तेलकट, पदार्थांचा आहारातील समावेश टाळावा.

पायाच्या भेगांमध्ये डॉक्टरांनी दिलेल्या क्रिम्सचा नियमित वापर करणे .

पायावर दुखण्याच्या पहिल्या टप्प्यात खूप ताण येणार नाही, याची काळजी घेणे.

मात्र चालणे टाळू नये.

Comments

Popular posts from this blog

विरुद्धार्थी शब्द | Opposite words in Marathi