सुंदर डोळ्यांची काळजी | Beautiful eyes care
Beautiful Eyes |
डोळे दुखत असल्यास काळजी घ्या :
>>* डोळे चोळू नयेत.
>>*पाण्याने स्वच्छ धुवावेत.
>> *डोळ्यांवर गुलाबपाण्याच्या घड्या ठेवाव्यात.
>> *सलग दोन-तीन तास कम्प्युटरवर काम करू नये.
>>* कम्प्युटर स्क्रीन आपल्या नजरेपेक्षा वर असू नये.
>> *सतत सुरू असलेल्या एसीमुळे डोळे कोरडे पडतात. जागरणामुळे डोळ्यांचे कायमस्वरूपी किंवा गंभीर विकार होत नसले तरी डोळे सुजणे, लाल होणे असा त्रास होतो.
* उपाय काय :
>> दुधासारख्या थंड पदार्थांचा आहारात समावेश असावा.
>> ‘अ’ जीवनसत्त्व डोळ्यांसाठी पोषक असते. म्हणूनच हिरव्या पालेभाज्या, पपई आणि गाजर नियमित खावे.
>> डोळे दुखत असल्यास दोन्ही हात एकमेकांवर जोरात घासून ऊर्जा तयार करावी. हात गरम झाल्यानंतर ते बंद डोळ्यांवर ठेवावेत. अशी क्रिया साधारण दोन ते तीन मिनिटांच्या अंतराने तीन वेळा करावी.
* व्यायाम :
>> एका पुठ्ठ्यावर काळा ठिपका काढावा. त्याकडे एकटक पाहावे. असे केल्याने दृष्टी सुधारतेच; पण मनही एकाग्र होते.
>> काळा ठिपका पुठ्ठ्यावर काढून पुठ्ठा गोल फिरवावा व ठिपक्याकडे एकटक पाहावे. असे करताना बुब्बुळे फिरतील व डोळ्यांचा व्यायाम चांगला होईल.
>> या व्यायामाच्या माध्यमातून डोळ्यांभोवती असलेल्या आठ स्नायूंची क्षमता वाढवता येते.
>> डोळ्यांवर गार-बर्फाच्या पाण्याच्या, गुलाबपाण्याच्या घड्या ठेवाव्यात. असे केल्याने रक्ताभिसरण सुधारू शकते.
* कसा असावा आहार :
>> आहाराचा व डोळ्यांच्या आरोग्याचा जवळचा संबंध आहे.
>> जीवनसत्त्व ‘अ’ हे डोळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असते.
>> रोजच्या आहारात जीवनसत्त्व ‘अ’ असेल तर डोळे चांगले राहतातच; पण त्वचाही मऊ मुलायम होते.
>> गाजर, पपई, लाल भोपळा यांसारख्या पिवळ्या व तांबड्या भाज्या-फळांमधून जीवनसत्त्व ‘अ’ आपल्या शरीराला मिळते.
>> लोणी, चीजमध्येही जीवनसत्त्व
‘अ’ असते; पण या पदार्थांचे आहारातील प्रमाण मर्यादित असावे.
>> डोळे चांगले राहण्यासाठी मा
डोळ्यांचे कायमस्वरूपी किंवा गंभीर विकार होत नाहीत, परंतु यामुळे डोळ्यांना सूज आणि लालसरपणा येतो.
Comments
Post a Comment