वजन वाढवण्यासाठी योग्य आहार | Weight Gain
Weight Gain Foods |
जसे लठ्ठपणामुळे अनेक आजार जन्म घेतात . त्याच प्रमाणे कमी वजनामुळे सुद्धा आता अनेक आजार उद्भवतात. कमी वजन असलेल्यांचे वजन कसे वाढवायचे आहे , हे आपण जाणून घेऊ या.
वजन वाढवण्याचे (Weight Gain) जे काही उपाय आहे ;अतिशय सोपे असे उपाय :
०१}सकाळी घाई गडबड करू नका. सकाळी उठल्याबरोबर घाईघाईने कामे करू नका. कोणत्याच प्रकारचा ताण, न घेता आपली दिनचर्या शांततेने सुरु करा . सकाळी उठल्यानंतर सगळ्यात अगोदर हलका व्यायाम करा . अथवा walk करा. त्यानंतर प्रोटीनयुक्त Breakfast सेवन करा . त्यामध्ये दूध, अंडी, दोन पेंडखजूर, एक केळी , अथवा काजू बदामाचा हलवा घ्या.
०२} दुपारचे जेवण (Healthy Diet) जेवण योग्य प्रमाणात सेवन करा. सर्वात अगोदर सलाडस सेवन करा. पूर्ण आहार घ्या. पोळी ,घट्ट वरणावर साजूक तूप घ्या, घट्ट दही एक वाटी, आवडीच्या भाज्या , पराठा ,गोड पदार्थ घ्या . शक्य असल्यास दुपारच्या वेळेस आराम करा .पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे .
०३} रात्रीच्या वेळेला पूर्ण आहार / Balanced diet सेवन करा .त्यानंतरअर्ध्या तासाने एक चमचा साजूक तूप घातलेले एक ग्लास दुध प्या .शतपावली झाल्यावर पुरेशी झोप घ्या. संशोधक सांगतात की, पूर्ण झोप न घेतल्याने चिडचिड वाढते, ताण येतो वजन घटते.रोज किमान आठ तास झोप घेणे हे आपल्या मेंदूसाठी, पचन क्रियेसाठी आवश्यक असते . या simple healthy diet / आहाराचा नियमितपणे उपयोगात आणला तर निश्चितच आपले वजन १० दिवसात वाढलेले दिसून येईल .
टेलिग्राम ग्रुपला जॉईन होण्यासाठी
👇👇येथे क्लिक करा👇👇
Comments
Post a Comment