त्वचेच्या समस्या व निगा | Skin Problems and Care

 

skin deases  and care
  Glowing Skin   

त्वचेच्या समस्या आणि त्वचा रोग घरगुती उपाय (Skin Problems Solution )

भारतासारख्या देशात त्वचेसंदर्भात अनेक तक्रारी आढळतात. खरुज, नायटा, गजकर्ण हे काही त्वचा विकार शरीरासाठी फारच त्रासदायक असतात. पण थोडीशी काळजी घेतली आणि योग्य औषधोपचार केले की, त्वचा रोग बरा होण्यास मदत मिळते. त्वचा रोगासंदर्भात तुम्हाला काही माहिती नसेल तर आज आपण त्वचेसंदर्भातील अशाच त्वचा रोगांची माहिती घेऊया. ही महत्वपूर्ण माहिती वाचून तुम्हाला त्वचेसदंर्भातील समस्यांवर योग्य निर्णय घेता येईल. जाणून घेऊया त्वचा रोगाचे प्रकार आणि त्वचा रोग घरगुती उपायासंदर्भात अत्यंत महत्वाची माहिती.त्यामुळे यांच्याबद्दल जाणून घेत त्यांच्यावरील सोपे आणि परिणामकारक अशा घरगुती उपायांची माहिती घेणेही गरजेचे आहे. चला जाणून घेऊया हे त्वचा विकार :

त्वचा फुटणे (Cold Sore)

 थंडीत त्वचा फुटण्याचा त्रास हा सगळ्यांनाच होतो. पण हा त्रास जर तुम्हाला वर्षभर होत असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज आहे. कारण जर तुमची त्वचा फुटत असेल तर तुमच्या त्वचेला काही अंतर्गत त्रास असण्याची दाट शक्यता आहे. त्वचा फुटण्याचा हा त्रास अधिक त्रासदायक त्यावेळी  वाटतो. ज्यावेळी त्वचा फुटते आणि तिथे जखमा होऊ लागतात. त्वचेच्या खपल्या पडू लागतात. त्वचा फुटण्याचा हा त्रास वेळीच निस्तरायचा असेल तर तुम्ही त्वचेची काळजी  योग्यवेळी घेणे फारच गरजेचे आहे. अगदी साध्या सोप्या उपायांनी तुम्हाला तुमच्या त्वचेची काळजी घेता येऊ शकते.

घरगुती उपाय (Solution):

त्वचा फुटल्यामुळे जर ती सतत जळजळत असेल तर तुम्ही त्याला पेट्रोलिअम जेली लावा. कारण पेट्रोलिअम जेली त्वचेला थंडावा देत त्वचा दुरुस्त करण्याचे काम करते.खोबरेल तेल किंवा बदामाचे तेलही त्वचेसाठी फारच चांगले असते. त्यामुळेही तुम्हाला थोडासा आराम मिळतो.

नायटा (Ringworm)

अपुऱ्या स्वच्छतेमुळे होणारा आणखी एक आजार म्हणजे ‘नायटा’ नायटा हा वेगवेगळ्या प्रकाराचे असतात. नायटा हा पसरत जाणारा आजार आहे. यामध्ये त्वचेला खूप खाज सुटते. हा आजार बुरशीमुळे होतो. अपुरी स्वच्छता, ओले कपडे, एकमेकांचे कपडे घालणे या सगळ्यामुळे हा आजार अधिक बळावण्याची शक्यता असते. खरुज, नायटा, गजकर्ण हे एकाच प्रकारातील असून हा त्रास गुप्तांगाकडे जास्त जाणवतो. यामध्ये सतत खाज येत राहणे, त्वचेचा दाह होणे, खरपुड्या पडणे, त्वचा सुकणे असा त्रास होऊ लागतो.

घरगुती उपाय (Solution):

स्वच्छ आंघोळ हा यावर एक उत्तम इलाज आहे. गरम पाण्याने नायटा झाला आहे त्या ठिकाणी स्वच्छ अंग धुवून घ्या.त्वचेचा दाह कमी होण्यासाठी एखादे मलम किंवा थंडावा मिळेल असे मलम लावा.

वांग (Wang)

 त्वचेवरील पिग्मेंटेशेन जास्त झाले की, त्वचा वेगळीच दिसू लागते. त्वचा काळवंडल्यासारखी आणि वयस्क दिसू लागते. वांगचा त्रास हा महिलांना अगदी कोणत्याही वयात होऊ शकतो. हा त्रास प्रामुख्याने चेहऱ्यावर होतो. त्यामुळेच त्वचा ही वेगळी दिसू लागते.आपल्या त्वचेत रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या पेशींमुळे आपल्याला रंग प्राप्त होत असतो. ज्याला मेलानोसाईट्स असं म्हटलं जातं. मेलानोसाईट्स मेलनिनचं उत्पादन करतात. ज्यामुळे त्वचेला रंग मिळतो. जेव्हा मेलानोसाईट्स प्रभावित होतात तेव्हा त्वचेतील काही भाग जास्त प्रमाणात मेलनिन निर्माण होतं. ज्यामुळे त्वचेच्या काही भागाचा रंग हा इतर भागाच्या तुलनेत जास्त गडद दिसू लागतो

घरगुती उपाय (Solution):

लिंबाचा रस,मध आणि पाणी एकत्र करुन तो वांगवर लावा. त्यामुळे वांगचे डाग जाण्यास मदत मिळेल.  कोरफडमध्ये नैसर्गिक पीएच असते. ज्यामुळे त्वचा एकसारखी होते,

मस्सा (Warts)

त्वचेसंदर्भातील हा त्रास फारसा त्रासदायक वाटत नसला तरी देखील तुमच्या सौंदर्यात बाधा आणण्याचे काम मस्सा करते. असे म्हणतात की, तुमच्या त्वचेवर एखादी जखम झाली असेल त्या ठिकाणी तुमची त्वचा उघडी झाली असेल तर काही ठराविक जंतू संसर्गामुळे तुम्हाला मस्सा येण्याची शक्यता असते. मस्सा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसरु शकतो. मस्साचे वेगवेगळे प्रकार असतात. मस्सा हा त्वचेच्या कोणत्याही भागावर होऊ शकतो. हात, हाताचा तळवा, पाय- पायाचा तळवा असा कुठेही मस्सा येऊ शकतो. मस्सा हा एखाद्या तीळाप्रमाणे दिसू शकतो. पण नंतर तो वाढत जातो. कधी तो चॉकलेटी दिसतो तर कधी तो लालही दिसतो. शरीरावरील मस्सा वाढण्याआधीच तुम्ही त्याची योग्य काळजी घ्यायला हवी.

घरगुती उपाय (Solution):

लसणीचा रस मस्सावर फारच फायदेशीर असतो. हा रस घेऊन तुम्ही मस्सावर लावा. ती जागा कपडयाने रात्रभर बांधून ठेवा.

सोरायसिस (Psoriasis)

 त्वचा रोगासंदर्भातील हा आणखी एक आजार आहे. हा आजार अनुवंशिक किंवा कोणत्याही जंतू संसर्गामुळे होत नाही. सोरायसिसमध्ये त्वचेवर पांढऱ्या रंगाचे चट्टे येतात, त्वचेचा भुसा पडू लागतो ही काही सोरायसिसची लक्षणे आहेत. त्वचेवर एखादी जखम झाली आणि त्याकडे दुर्लक्ष केले गेले की, ती वाढण्याची शक्यता असते. सोरायसिसची सुरुवात नेमकी कशी होते ते कळत नाही. ते अद्याप कोणालाही कळलेले नाही. त्वचेची ही जखम अचानक वाढू लागते. हे चट्टे खूप वाढू लागतात. त्वचेवरुन साल निघाल्याप्रमाणे त्वचा सोलू लागते. मृत त्वचा निघणे असे पहिले लक्षण सोरायसिसमध्ये दिसू लागते.

घरगुती उपाय (Solution):

कोरफडीचा गर आणि खसखर वाटून सोरायसिस झालेल्या भागी लावा थोडा आराम मिळतो. खाजेपासून थोडी सुटका होते.महावज्रक तेल हे आयुर्वेदिक तेल या जखमेवर काम करते.हळदीची गोळी अर्थात कुंकर्मा आणि मधुपर्णी तेलाच्या सेवनामुळेही बराच फरक पडतो.

खरूज  (Scabies)

 संसर्गजन्य आजारांपैकी एक महत्त्वाचा आजार म्हणजे खरूज (Scabies) होय. सारकॉप्टिस (Sarcoptes Scabiei) या परज‌िवी किड्यामुळे होणारा हा संसर्ग प्रामुख्याने अस्वच्छता, गर्दी, दाटीवाटी, आरोग्यविषयक जाणीवांचा अभाव, कमी झालेली प्रतिकारशक्ती अशा कारणांमुळे होतो. दर तीस वर्षांनी खरूज साथीसारखं पसरतं, असं समजलं जातं.

अनेक शतकांपासून मनुष्याला ज्ञात असलेल्या संसर्गजन्य आजारांपैकी एक महत्त्वाचा आजार म्हणजे खरूज (Scabies) होय. सारकॉप्टिस (Sarcoptes Scabiei) या परज‌िवी किड्यामुळे होणारा हा संसर्ग प्रामुख्याने अस्वच्छता, गर्दी, दाटीवाटी, आरोग्यविषयक जाणीवांचा अभाव, कमी झालेली प्रतिकारशक्ती अशा कारणांमुळे होतो. दर तीस वर्षांनी खरूज साथीसारखं पसरतं, असं समजलं जातं.

घरगुती उपाय (Solution):

स्वच्छ आंघोळ हा यावर एक उत्तम इलाज आहे.स्वच्छ अंग धुवून घ्या.त्वचेचा दाह कमी होण्यासाठी एखादे मलम किंवा थंडावा मिळेल असे मलम लावा.

Comments

Popular posts from this blog

विरुद्धार्थी शब्द | Opposite words in Marathi