पायाच्या पोटऱ्या दुखणे | Pain in the ankles

 

cure sciatica
    sciatiaca paina     


पायाच्या पोटऱ्या दुखतात - घरगुती उपाय :

  आपल्याकडून आजकालच्या बदलेल्या जीवनशैलीत अनेकांना कमी वयातच पाय दुखण्याची समस्या जाणवू लागते. कधी हे पायाचं दुखणं अचानक उद्भवतं तर कधी थांबून थांबून जाणवतं. पूर्वीच्या काळी आपल्या आजीआजोबांना पाय दुखण्याचा किंवा सांधेदुखीचा त्रास हा म्हातारपणी जाणवायचा. पण आजकालच्या पिढीला हा त्रास तरूणपणीच जाणवू लागला आहे. याचं कारण म्हणजे बदलती जीवनशैली आणि बदलेल्या खाण्याच्या सवयी यामध्येही दडलेले आहे. तसंच आजकाल दगदग टाळण्यासाठी अनेकजण शक्य असेल तेव्हा लिफ्टचा वापर करतात किंवा रिक्षाने प्रवास करणे. तासंतास कामामुळे एका ठिकाणी बसून राहणे, एसीमध्ये जास्त वेळ असणे यासारख्या गोष्टींमुळे ही पायाचं दुखणं जाणवू लागलं आहे. चला जाणून घेऊया पायाचे…

1] एका मोठ्या चमच्यामध्ये नारळाचे तेल घ्या. यात लसूणाच्या सोललेल्या ५ ते ६ पाकळ्या टाकून भाजून घ्या. जेव्हा तेल थंड होईल तेव्हा या तेलाने कंबरेसोबत पूर्ण शरीराची मालिश करून घ्यावी आणि मग अंघोळ करावी. लसून हे नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करते. यामुळे तुम्हाला वेदनेपासून लवकर आराम मिळेल. एक गोष्ट लक्षात ठेवा की मालीश करण्याआधी किमान ३० मिनिटांनीच अंघोळ करावी. जेणेकरून या वेळेत तुमचे शरीर हे मिश्रण शोषून घेईल.

2] सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना पायाचे काही किमान व्यायाम केल्यास पाय दुखी ची समस्या निश्चित कमी होऊ शकते. या व्यायामामुळे पायातील ताणलेल्या शिरास मोकळा होण्यास मदत होते.

3] शरीराचा रक्त प्रवाह सतत खालच्या दिशेने होत असतो, त्यामुळे मुद्दाम झोपताना किंवा बसताना पाय उशीवर थोडे वरच्या दिशेने ठेवल्यास त्याचाही पायदुखी कमी होण्यास फायदा होऊ शकतो.

4] शक्य तेव्हा पायांना तेलाने मालिश करणे हा पाय दुखी कमी होण्यासाठी चा आणखी एक उपाय आहे. यामध्ये पायाचे तळवे त्याचा बोटे गुडघे यांना मालीश करावे. त्यामुळे शिरा मोकळ्या होऊन आराम मिळू शकतो.

5] पाय जास्त दुखत असतील तर गरम पाण्यात पाय घालून 20 ते 25 मिनिटे बसावे या पाण्यात मीठ टाकल्यास आणखी चांगले यामुळे दुखणारे पाय मोकळे होण्यास मदत होते. 

6] पाय दुखण्याचे आणखी एक कारण असते त्यामुळे ज्यांचे पाय दीर्घकाळ दुखतात. त्यांनी वजन कमी करण्यावर भर द्यावा व्यक्तीचे वजन त्याच्या गुडघ्यावर येते, त्यामुळे त्याचे गुडघे दुखतात. अशाने वजन नियंत्रित राहील याची काळजी घ्यावी.

7] आहारात प्रथिने जीवनसत्त्वे व शरीरासाठी आवश्यक असणारे इतर घटक योग्य प्रमाणात नसतील तरीही पायदुखी सारखी समस्या शकते, त्यामुळे योग्य तो संतुलित आहार मिळण्यावर भर द्यावा.

8] बराच काळ खुर्चीत बसून काम केल्याने कालांतराने पाय दुखायला लागतात. अशावेळी बसलेल्या जागीच पाय सरळ करून स्ट्रेच करावेत यामुळे थकवा दूर होतो आणि काही वेळा करता आराम मिळतो.

9] आपण दररोज वापरत असलेली चप्पल बूट सॅंडल ही पादत्राणे योग्य नसतील, तर त्यामुळे पाय दुखीचे समस्या उद्भवू शकते .त्यामुळे योग्य ती पादत्राणे वापरावी.

10] अनेकदा थंड असलेल्या ठिकाणी गारठ्यामुळे सुद्धा पाय दुखत असतात. तसेच घरातील फरशी टणक असल्याने सतत उभे राहिल्यास विशेषतः महिलांच्या टाचा आणि पावले दुखू शकतात, अशा वेळी घरात ही स्लीपर चा नियमित वापर करावा.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

विरुद्धार्थी शब्द | Opposite words in Marathi